युरोप भ्रमंती – भाग 1

ऑक्टोबर 2015 मध्ये जर्मनी देशात काम करायची संधी मिळाली आणि माझी युरोप सफारी सुरु झाली . Erlangan नावाच्या एका छोट्या पण अतिशय सुंदर गावात मी 2 वर्षे वास्तव्य केला. आदिदास या विश्वविख्यात बूट कंपनी च्या मुख्यालयात काम करायची संधी मिळाली आणि मी या ब्रॅण्डच्या प्रेमातच पडलो . आदिदासच सगळं काही होता माझ्याकडे बूट छत्री फुटबॉल बॉडी स्प्रे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट पाकीट टॉवेल चप्पल अगदी सगळंच होता . मला सगळे आदिदासचा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणायचे . जर्मन लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव खरंच खूप छान होता . कामाच्या वेळी फक्त काम आणि सुट्टीच्या दिवशी फक्त सुट्टी एन्जॉय करायची हे मी जर्मन लोकांकडून शिकलो . जर्मनी मध्ये भाषेचा प्रॉब्लेम खूप आहे अशी भीती माझ्या मनात होती आणि ती थोड्या प्रमाणात खरी पण ठरली . मला मात्र एकच शब्द चांगला शिकायला मिळाला आणि तो म्हणजे गुटेन मॉर्गन अर्थात सुप्रभात . बाकी 2 वर्षात जर्मन भाषा शिकण्याच्या भानगडीत मी पडलो नाही . अगदी गरजच पडली तर गूगल साहेबांची मदत घेतली आणि जर्मनी मध्ये काम करायची इच्छा पूर्ण केली . जर्मनी मध्ये कुठलाही कस्टमर सपोर्ट इंग्लिश मध्ये नाही . फक्त एकाच भाषेत आणि ती भाषा म्हणजे जर्मन . सगळे बोर्ड जर्मन भाषेतच . रेल्वे स्टेशन ला इथे bahnhalf म्हणतात . जर्मनी या देशाची आणखी खासियत म्हणजे इथे सगळ्या गावात समान नाव रस्त्याला आढळतात . Beer हे इथला प्रमुख पेय . एक म्हण इथे प्रचलित आहे when germans are thirsty they drink beer . बिअर फेस्टिवल ही इथली खासियत आणि munich चा फेस्टिवल तर जगभर प्रसिद्ध आहे . ह्या फेस्टिवल साधारण 10 लाख परदेशी पाहुणे दरवर्षी येतात आणि यथेच्छ बिअर पितात नाचतात गातात . नुसता धिंगाणा असतो 1 महिना . बार्ली हे इथला प्रमुख पीक आणि ह्याचीच बिअर इथे घरोघरी तयार करतात . दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण बेचिराख झालेल्या जर्मनीने अथक परिश्रम करून केलेली उभारणी थक्क करून सोडणारी आहे . बेचिराख झालेले किल्ले घर आणि शहर जशीच्या तशी उभारली आहेत . अत्त्याचार काय असतो हे जर्मन माणसाने इतका सोसला आहे कि आता तो करायची इच्छा नाही असा ते अभिमानानं सांगतात . त्यांच्या या कृतीला माझा सलामच . आज इथेच थांबतो पुढच्या लेखात अजून बरच काही सांगायचं आहे
सचिन
युरोप भ्रमंती भाग 2

सव्वा दोन वर्षाच्या वास्तव्यात 13 देश पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होता . आणि हे सगळं शक्य होता ते युरोपिअन युनियन च्या schengen व्हिसामुळे . हा व्हिसा युरोपमधल्या 25 देशांसाठी एकत्र मिळतो . भारतातून काम करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी अथवा फिरण्यासाठी या schengen व्हिसा चा उपयोग होतो . चला आज पासून फेरफटका मारूया जर्मनी देशाचा . जर्मनी ची राजधानी बर्लिन . बर्लिन ची भिंत सगळ्यांच्याच परिचयाची. एक अतिशय सुंदर ऐतिहासिक शहर हीच बर्लिन ची ओळख . पूर्व आणि पश्चिम जर्मनी चा विलीनीकरण ह्याच गावात झाला आणि त्याचा इतिहास सांगणारा टूर खूपच छान . दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास जर थोडक्यात ऐकायचा आणि बघायचा असेल तर बर्लिन ला भेट देण्याशिवाय पर्याय नाही . बर्लिनच्या भिंतीचे आता फक्त अवशेष बघायला मिळतात पण त्या ठिकाणी असलेला संग्रहालय अतिशय सुंदर. त्या संग्रहालयात हिटलरच्या अन्यायाचा जणू पाढाच मांडला आहे असा वाटत आणि हिटलर किती निर्दयी होता ह्याची प्रचिती येते. इथे असलेला भव्य प्रवेशद्वार पूर्व आणि पश्चिम जर्मनी च्या एकत्रीकरणाची साक्ष देऊन जात . ऐतिहासिक वास्तूबरोबरच बर्लिन मध्ये अनेक स्थळ बघण्यासारखी आहेत त्यात प्रामुख्याने भव्य असा प्राणिसंग्रहालय , विमानतळासारखाच भव्य असा बर्लिन चा रेल्वे स्टेशन , 80 मजले उंच टीव्ही टॉवर , बोट राइड, खाण्याची, शॉपिंग ची हजारो दुकान आणि बरच काही . इथे फिरण्यासाठी बिग बस टूर च्या hop on hop off बसेस संपूर्ण शहर एकाच तिकिटामध्ये फिरवतात आणि पूर्ण दिवस बर्लिन पास मध्ये कमी पैशात खूप ठिकाण बघता येतात . गुगल ची मदत घायची आणि बर्लिन ची सफारी करायची . बर्लिन ला जाण्यासाठी विमानसेवा तर आहेच पण जर्मनी च्या अनेक शहरांमधून बुलेट ट्रेन्सने जाता येत . सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं हे ऐतिहासिक शहर एकदा तरी बघायलाच हवा. आज इथेच थांबतो ..
सचिन
युरोप भ्रमंती – भाग 3

आता जर्मनीच्या काही छोट्या गावांचा फेरफटका मारूया . दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण बेचिराख झालेला आणखी एक छोटा शहर म्हणजेच नुरेमबर्ग . जर्मनी देशाच्या साधारण मध्यभागी हे शहर वसलेला आहे . म्युनिक किंवा फ्रांकफुर्ट शहरापासून साधारण डिड तास रेल्वे प्रवास करून इथे जाता येत . इथे विमानतळ देखील आहे आणि दिल्लीहून लुफ्तान्साची थेट विमानसेवा देखील
आहे . शहराच्या मध्यभागी छोटंच पण सुंदर असा रेल्वे स्टेशन सेल्फी फोटो काढायला भाग पाडता. या स्टेशनपासून अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर इंपिरियल किल्ला आहे . तुम्ही सहज चालत जाऊ शकता इतका हा किल्ला जवळ आहे . हा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूची वसाहत दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण उध्वस्त झाली होती. आता मात्र हा किल्ला आणि आजूबाजूची वसाहत जशीच्या तशी नव्याने उभी आहे . ह्या किल्ल्यावरून पूर्ण शहराचा नजारा खूपच छान दिसतो . ह्या किल्ल्याच्या वाटेवर एक frauenkirche नावाचा अतिशय जुना पण वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना असलेला चर्च निश्चितच मनाला भावतं . या गावात मला प्रथमच ट्राम बघायला मिळाली आणि नंतर ती अनेक शहरात बघायला आणि फिरायला मिळाली . नाझी ग्राउंड हे इथला आणखी एक ऐतिहासिक ठिकाण . स्टेशन पासून ट्राम ने इथे जाता येत. हिटलर ने ह्याच ग्राऊंडवर अनेक ज्यु निष्पाप नागरिकांना डांबून मारला होता . इतिहासाची ती घटना ऐकल्यावर अजूनही अंगावर काटा येतो . या शहराचा आणखी एक वैशिष्ट म्हणजे क्रिसमस मध्ये इथे भरणारा क्रिसमस मार्केट . किल्ल्याच्या वाटेवरच हे मार्केट साधारण 24 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर असता . या मार्केटमध्ये असंख्य खाण्यापिण्याचे तसेच विविध सुंदर वस्तूंचे स्टॉल बघायला मिळतात . लाखो पर्यटक दरवर्षी इथे येतात . या मार्केट मध्ये मिळणारी glue wine जगात कुठेच मिळत नाही . ही glue wine चहासारखी गरम करून दिली जाते आणि ती एका छान सुबक कप मधे दिली जाते . हा कप आठवण म्हणून बरेच पर्यटक विकत घेतात . स्टेशन जवळच संगम नावाचा भारतीय हॉटेल आहे . माझा आणि जर्मनी मधल्या अनेकांचा हे जेवणाचा आवडता ठिकाण . या शिवाय या शहरात एक सुंदर रेल्वे संग्रहालय आणि प्राणी संग्रहालय पण बघण्यासारखा आहे . माझ्या युरोप भ्रमंतीची सुरुवात ह्याच शहरातून झाली आणि पुढे अनेक वेळा मला इथे जायला संधी मिळाली . जर्मनी मध्ये कधी गेलात तर नुरेमबर्ग ला नक्की जा .
सचिन
mobile – 8605697161